Breaking-newsमहाराष्ट्र

सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचा निर्णय लागू करा: हिंदु जनजागृती समिती

Share On
  • श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचे प्रकरण
कोल्हापूर- कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीचा हा प्रयत्न स्तुत्य असून असा नियम राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
तिरुपती येथील मंदिरांसह देशातील अनेक मंदिरांत तोकड्या कपड्यांत महिला आणि पुरुष भाविकांना देवाचे दर्शन दिले जात नाही. काही मंदिरांत स्थानिक प्रथा-परंपरेनुसार पोषाखाचे नियम असतात. तसेच गाभार्‍यात जाऊन दर्शन घ्यायचे असेल, तर सोवळ्यात जावे लागते. त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी आमची भूमिका आहे.
मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहेत. तेथील शक्ती, चैतन्य, सात्त्विकता, ऊर्जा ही भाविकांनी मनोभावे पूजा केल्याने तर मिळतेच, पण सात्त्विक वस्त्र परिधान केल्यास ती अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. भाविकांनी पुरोगाम्यांच्या अपप्रचाराला न भुलता धर्मपालन करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button