Breaking-newsमनोरंजन

“वीरमादेवी’तून सनी लिओन हटवण्यासाठी आंदोलन

अभिनेत्री सनी लिओन हिने वीरमादेवी या कन्नड चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. परंतु ही गोष्ट कट्टरवादी विचारांच्या संघटनांच्या पचनी पडलेली नाही. पूर्वाश्रमीच्या पॉर्न स्टारने वीरमादेवीची भूमिका करणे अपमानास्पद असल्याचे मत कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या युवा सेनेने व्यक्त केले आहे.

वीरमादेवी हा दाक्षिणात्य बहुभाषेत प्रदर्शित होणार असलेला चित्रपट आहे. यात सनी लिओनी वीरमादेवीच्या प्रमुख भूमिकेत आहे. या वीरमादेवीने संपूर्ण दाक्षिणात्य भूभागावर राज्य केले होते. यात एका लढाऊ महाराणीचा रोल या सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे. अशा व्यक्तीची भूमिका पॉर्न स्टार सनीने करणे हा खूप मोठा अपमान असल्याचे या संघटनेचे मत आहे. आज बंगळूरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वीरमादेवी चित्रपटाचे पोस्टर फाडत आंदोलन केले. या चित्रपटातून सनीला हटवा अशी भूमिका त्यांनी घेतलीय.

ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.दुसरीकडे सनीला मीनाकुमारीच्या बायोपिकसाठीही निवडले गेले आहे. बॉलिवूडमध्ये सनी लिओनच्या या दोन्ही भूमिकांबद्दल खूपच सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र प्रेक्षकांकडून सनीच्या या रोलना विरोध होईल, असा निर्मात्यांचा अंदाज नव्हता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button