Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
सनातनच्या हिटलिस्टवर असलेल्या श्रीमंत कोकाटेना संरक्षण द्या – संभाजी ब्रिगेड

पुणे – श्रीमंत कोकाटे यांचे नाव सनातनच्या हिटलिस्टवर असल्याने त्यांना राज्य सरकारने संरक्षण पुरवावे. त्यांना काही झाल्यास संभाजी ब्रिगेड जशाच तसे उत्तरे देईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. सनातनवर बंदी आणण्याची मागणी देखील त्यांनी केली.
यावेळी प्रवीण गायकवाड म्हणाले की, राज्यातील पुरोगामी चळवळीतील ३६ व्यक्तींच्या जीवाला हिंदुत्ववादी संघटनाकडून धोका आहे. त्याकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्या 36 जणांमध्ये बी जी कोळसे पाटील, श्रीमंत कोकाटे, आ.ह.साळूखे, शरद पाटणकर असून राज्य सरकारने सुरक्षा न पुरवल्यास संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संरक्षण पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.





