Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पंतप्रधान आवास योजनेत दीडशे कोटीचा गैरव्यवहार – खासदार आढळराव- पाटील

पिंपरी –  रावेत, च-होली, बो-हाडेवाडी, डूडूळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेत दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या गैरव्यहारबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याबाबत या प्रकल्पाच्या चाैकशीचे मागणी केली आहे, भाजप सरकारने चौकशी न केल्यास न्यायालयात जाणार आहे, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी भोसरीतील पत्रकार परिषदेत दिला. 

यावेळी जिल्हाप्रमुख राम गावडे, पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटक सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट उपस्थित होते. खासदार आढळराव-पाटील म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरे मिळणार आहेत. या योजनेला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. परंतु, ज्या पद्धतीने ही योजना राबविली जात आहे. त्यामध्ये होणा-या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. ठेकेदारांना दमबाजी केली जाते. निविदा भरु दिल्या जात नाहीत. प्री-बिडला दहा ठेकेदार येतात आणि त्यानंतर तीनच ठेकेदार येतात. त्यांना धमकाविले जाते. जवळच्याच लोकांना कामे दिली जातात.

विरोधकाकडून आरोप केल्यानंतर एक काम कमी करुन दहा कोटी कमी केले जातात. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर पुन्हा दहा कोटी कमी करतील. हा काय प्रकार आहे, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, महापालिकेत ‘होलसेल’ पद्धतीने भ्रष्टाचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपचा भ्रष्टाचार अधिक वेगात सुरु आहे, असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group