Breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापौर पदासाठी जगताप समर्थकांची वर्षावर धडक, मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे

Share On

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर पद चिंचवड विधानसभा मतदार संघातील ओबीसी नगरसेवकाला मिळावे यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी मुंबई येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावर आज धडक दिली. नगरसेवक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या महापौर पदावरून शहरांतर्गत भाजपमध्ये मोठी फूट पडली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी हे पद माळी समाजाकडे ठेवण्यासाठी काल शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर दबाव वाढविला. त्याचा धसका घेऊन चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी हे पद चिंचवड विधानसभेतील ओबीसी नगरसेवकाला मिळावे, यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर आज रविवारी (दि. 29) धाव घेतली. “भाऊ” गटातील 25 नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यांना दुपारी दोनची वेळ देण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री मराठा क्रांती मोर्चासंदर्भात महत्वाच्या मुलाखतीत अडकल्यामुळे नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला वर्षा बंगल्यासमोर वेट अॅण्ड वॉच करावे लागत आहे.

या शिष्टमंडळात चिंचवड विधानसभेतील भाऊ समर्थक नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, कैलास बारणे, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, तुषार कामठे, तुषार हिंगे, सीमा सावळे, उषा मुंढे, शारदा सोनवणे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले आदींचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button