Breaking-newsराष्ट्रिय

पुलवामात दहशतवाद्यांकडून पोलीस अधिका-याचे अपहरण

Share On

श्रीनगर – मोहम्मद सलीम शहा आणि जावेद अहमद दार या दोन पोलीस कर्मचा-यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका पोलिसाचे अतिरेक्‍यांनी अपहरण केले आहे. या घटनेमुळे पुलवामात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री काश्‍मीरच्या त्राल येथून या पोलीस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले आहे.

मुदासीर अहमद असे अपहरण करण्यात आलेल्या पोलीस अधिका-याचे नाव आहे. ते अवंतीपुराच्या राशीपुरा येथे तैनात होते. अतिरेक्‍यांनी अहमद यांचे त्राल येथील त्यांच्या घराजवळून अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. अहमद यांच्या कुटुंबीयांनीही ते रात्रीपासून गायब असल्याचे म्हटले आहे. मात्र भारतीय लष्कराकडून त्याला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

अहमद यांचा शोध घेण्यात येत असून शोध मोहिम सुरु आहे. त्राल हा हिजबुल मुजाहिद्दीनचा गड मानला जातो. या परिसरात सर्वाधिक दहशतवादी कारवाया होत असतात.

दरम्यान, यापूर्वी दहशतवाद्यांनी सुटीवर आलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम शहा यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर 6 जुलै रोजी दहशतवाद्यांनी पोलीस शिपाई जावेद अहमद दार यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button