मनोरंजन

वरुण धवन सलूनमध्ये गेला सायकलवरून

वरुण धवन आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भन्नाट आयडिया लढवत असतो. तो सध्या “सुई धागा’मध्ये काम करतो आहे. त्यातील लुकसाठी त्याला नुकतेच सलूनमध्ये जावे लागले होते. “सुई धागा’च्या शुटिंगचे शेवटचे शेड्युल त्याने नुकतेच पूर्ण केले. त्यात त्याचा लुक अगदी वेगळा असणार होता. सिनेमात बऱ्याच अंशी त्याने दाढी वाढवलेली दिसणार आहे.

मात्र अखेरच्या शेड्युलसाठी त्याला दाढी काढून केवळ मिशा ठेवायला लागणार असल्याने त्याला सलूनला जायचे होते. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो चक्क सायकलवरून आणि तेही मुंबईतल्या एका सामान्य सलूनमध्ये एखाद्या सर्वसामान्य ग्राहकाप्रमाणे गेला होता. त्याला सायकलवरून कोणी ओळखणार नाही, असा त्याचा अंदाज असावा. मात्र फिल्मी गॉसिपच्या पोरेमात असलेल्या चाणाक्ष प्रेक्षकांनी त्याला बरोबर हेरले.

सायकलवरच्या वरुण धवनचे फोटोही लवकरच व्हायरल झाले. “सुई धागा’मध्ये वरुणच्या बरोबर अनुष्का शर्मा असणार आहे. या सिनेमाच्या शिर्षकावरूनच हा सिनेमा शिवणकामाशी संबंधित असल्याचा भास होतो. त्याच प्रमाणे अनुष्कानेही प्रथमच हातात सुई धागा घेऊन शिवणकाम केलेले दिसणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button