Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वप्नील जावळे याचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन सत्कार

पिंपरी – रहाटणी येथील स्वप्नील नेताजी जावळे याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 99.60% गुण मिळवून शहरात अव्वल येण्याचा मान मिळविला. त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे यांच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते स्वप्नीलला लॅपटॉप, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे, सखाराम नखाते, राजाराम शेलार, सागर नखाते, अमर तांबे, स्वप्नील आभाळे, तुषार ढाके आदी यावेळी उपस्थित होते.

लक्ष्मण जगताप म्हणाले की, स्वप्नीलने जिद्द, मेहनत व चिकाटीने अभ्यास करून हे यश मिळविले आहे. मुळातच स्वप्नील हुशार मुलगा आहे. यापूर्वी देखील त्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला आहे. त्याने अशीच जिद्द ठेवली तर भविष्यात स्वप्नील मोठ्या पदावर असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button