Breaking-news

येडियुरप्पांचे २४ तासांत जाऊ शकते मुख्यमंत्री पद ?

Share On

नवी दिल्ली : कर्नाटकात भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सरकार राखण्यासाठी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. येत्या २४ तासांत सर्वोच्च न्यायालयात बहुमताचा आकडा सिद्ध करता आला नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पा यांना येत्या २४ तासांत ११२ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत त्यांना ही यादी सादर करावी लागणार आहे. त्यामुळे २४ तासांत त्यांना आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपकडे सध्या १०४ आमदारांचं पाठबळ आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी ८ आमदारांचा पाठिंबा हवा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button