कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचवेळी लोकशाहीची हत्या झाली- अमित शहा

कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचवेळी लोकशाहीची हत्या झाली- अमित शहा

बंगळूरू : कर्नाटकात पुरेसं संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपाला कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. आज सकाळी भाजपा नेते येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीवर राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन केलेल्या शाब्दिक हल्ल्याचे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटरवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाकडून पोकळ विजयाचा जल्लोष सुरू असला, तरी देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याचं दु:ख आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी भाजपावर टीका केली. राहुल गांधींच्या या टीकेला अमित शहा यांनी उत्तर दिलं आहे. ‘ज्यावेळी काँग्रेस पक्षानं संधीसाधूपणा करुन जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचवेळी लोकशाहीची हत्या झाली,’ अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

Amit Shah

✔@AmitShah

The ‘Murder of Democracy’ happens the minute a desperate Congress made an ‘opportunist’ offer to the JD(S), not for Karnataka’s welfare but for their petty political gains. Shameful!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *