Breaking-news

उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार करुन व्हिडीओ केला व्हायरल

दिल्ली – उत्तर प्रदेशात एका महिलेवर दोघांकडून बलात्कार करण्यात आल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कन्नौज पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आरोपींनीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

२४ एप्रिलला हा सामूहिक बलात्कार झाला अशी माहिती पीडित महिलेच्या बहिणीने दिली आहे. ‘जर आरोपांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली नाही तर आम्ही सगळे आत्महत्या करु’, असा इशारा महिलेच्या बहिणीने दिला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिब आणि सलमान अशी आरोपींची नावे असून दोघेही त्याच परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेली असता आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. समाजात बदनामी होईल या भीतीने पीडित महिलेने घटनेबद्दल कुटुंबियांना काहीच सांगितलं नव्हतं.

आरोपींनी बलात्कार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ज्यानंतर पीडित महिलेने कुटंबियांसोबत स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी व्हिडीओच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवून लवकरच त्यांना अटक करु असं म्हटलं आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात १९ वर्षीय कॉलेज तरुणीवर तिच्या प्रियकराने मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींनी व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना अटक केली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button