Uncategorized

बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ मुंबईत दाखल

बॉलिवूडचे ‘बाजीराव -मस्तानी’ अर्थात अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण  इटलीतील लेक कोमा परिसरात विवाहबंधनात अडकले. १४ -१५ नोव्हेंबर रोजी कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न करणारी ही जोडी नुकतीच मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर आल्यानंतर काही क्षणांच्या कालावधीतच त्यांचे फोटो व्हायरल झाले आहे.

डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देणारी ही जोडी मुंबई केव्हा येणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. मात्र मध्यरात्री या दोघांचं मुंबईमध्ये आगमन झालं आलं. विशेष म्हणजे या जोडीचं मुंबईत आगमन झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी दीपिकाने गोल्डन कलरचा सूट घातला होता. तर रणवीरने क्रिम कलरचा कुर्तो आणि त्यावर लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं.

Embedded video

ANI

@ANI

WATCH: Ranveer Singh and Deepika Padukone at Ranveer Singh’s residence in Mumbai. They got married earlier this week in Italy’s Lombardy

554 people are talking about this

दरम्यान, लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीरच्या घरी जाणारी दीपिका एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. दीपिकाच्या हातात लाल चुडा आणि कपाळावर सिंदूर लावल्याचं यावेळी पाहायला मिळालं. तिचा हा नवा लूकदेखील चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे. आता मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर दीप-वीर लवकरच  बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना एक जंगी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. त्यामुळे या पार्टीमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी उपस्थित राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button