breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Video : अवघ्या ५ सेकंदात १७०० कोटी गेले पाण्यात, व्हिडीओ एकदा पाहाच..

Bridge Collapse Video : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल ४ जून रोजी सायंकाळी कोसळला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज येथे गंगा नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. पूल गंगा नदीत कोसळल्याने पाण्याच्या अनेक फूट उंच लाटा उसळल्या. पूल कोसळल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – Monsoon Update : यंदाचा मान्सून लांबला! ४ ते ५ दिवस उशीर होणार

गंगा नदीवर खगरियाच्या अगुवानी-सुलतानगंज दरम्यान हा पूल बांधला जात होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०१४ साली पुलाची पायाभरणी केली होती. १७०० कोटी रूपयांचा खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या पुलाचा स्लॅब दोन वर्षापूर्वी कोसळला होता. या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button