breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात १२०० होर्डिंग; १५ दिवसात होणार होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट

पिंपरी | मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या १४ वर गेला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात १२०० अधिकृत होर्डिग आहेत. या होर्डिंगचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने होर्डिंग चालक, मालकांची बैठक घेऊन स्ट्रक्चरल ऑडिटचा दाखला घेतला. शहरात ३१ मार्च २०२४ अखेर १ हजार १३६ अधिकृत होर्डिंग होते. त्यानंतर परवाना विभागाने नव्याने ६० होर्डिंगला परवानगी दिली. त्यामुळे शहरात एकूण १ हजार १९६ अधिकृत होर्डिंग सद्यस्थितीत आहेत.

हेही वाचा     –      ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’; ठाकरे गटाची खोचक टीका 

पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या मार्गाच्या दोन्ही बाजूला ३५ मोठ-मोठे होर्डिंग आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावरून पंढरपुरकडे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा दरवर्षी मार्गस्थ होत असतो. यंदा जूनअखेर पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे या मार्गावर एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच धोकादायक होर्डिंग काढण्याची मागणी होत आहे.

शहरातील सर्व होर्डिंग मजबूत असल्याची खातरजमा करावी. कमकुवत असेल तर ते त्वरित हटविण्यात यावे, अशा सूचना पालिकेने एप्रिल महिन्यातच दिल्या होत्या. वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने सांगाडा पडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास संबंधित सांगाडा धारकांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पालिकेने यापूर्वीच दिला आहे. मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील होर्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार पुढील १५ दिवसात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button