breaking-newsTOP Newsराष्ट्रिय

५ ऑगस्टपासून जीम-योगा सेंटर सुरु करण्यास केंद्राचा परवानगी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकट काळात देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र, आता संपूर्ण देशात अनलॉकच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. हळूहळू विस्कळीत झालेले जनजीवन हे पूर्वपदावर येताना दिसत आहे. त्यानूसारच ५ ऑगस्टपासून देशात जीम आणि योगा सेंट्रल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जिम आणि योगा केंद्राबाबतच्या सुरक्षात्मक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. जिम किंवा योगा सेंटरमध्ये जाताना याबाबतच्या गाईडलाईन्स पाळणे गरजेचे असणार आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये येणाऱ्या जिम तसेच योगा सेंटर सुरु करता येणार नाही. ज्या जिम किंवा योगा सेंटर कंटेन्मेंट झोनच्या बाहेर आहेत, फक्त तेच सुरु करता येणार आहे.

काय आहेत नियम ?

१- प्रत्येक व्यक्तीचे तापमान चेक करणे आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक

२- केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले वेळेचे सर्व नियम पाळणे गरजेचे असेल.

३- 65 वर्षांपेक्षा अधिक, गरोदर महिला आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी.

४- जिम तसेच योगा करताना सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे असणार आहे. दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर आवश्यक असणार आहे.

५- जिम आणि योग सेंटरच्या परिसरात असताना तोंडावर मास्क घालणे गरजेचे असेल, मात्र जिममध्ये व्यायाम किंवा योग करताना मास्क घालण्याचे बंधन नसेल.

६- जिम आणि योगादरम्यान कमीत कमी 60 सेकंद हात धुणे गरजेचे असेल. सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक

७- परिसरात थुंकण्यास सक्त मनाई असेल.

८- आरोग्य सेतू अॅपचा वापर करणे गरजेचे

९- जर एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर त्याने जवळच्या आरोग्य केंद्रात जावे.

१०- नाक तोंड पुसताना टिश्यू पेपरची विल्हेवाट लावणे आवश्यक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button