breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोंढवा सीमाभिंत दुर्घटना, दोघांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 17 जणांच्या मृत्यू प्रकरणी विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या बिल्डर बंधूंना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. कोर्टाने दोघांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी प्रकरणी या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-64) यांनी पुण्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्विकारली आहे. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या 17 कामगारांचे मृतदेह पहाटे एअरफोर्सच्या विमानाने दिल्ली आणि पाटण्याला रवाना करण्यात आले.

विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आले. सन 2013 मध्ये बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीसाठी वारंवार बिल्डरला पत्र देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र, बिल्डरनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे 17 कामगारांचा निष्पाप जीव गेला. बिल्डरने सोसायटी हॅंडओव्हर केलेली नसल्याने संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीची जबाबदारी ही बिल्डरची आहे. असा आरोप अगरवाल बिल्डरवर करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button