breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

प्रदूषण कमी करण्यासाठी विशिष्ट रोडची निर्मिती करणार; मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विविध प्रकल्पांवर चर्चा झाली असल्याचे सांगितले. मुंबई-पुण्यातील वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी एक विशिष्ट रोड तयार करण्यात येणार असून या मार्गासाठी 6 हजार कोटी खर्च केले जाणार आहे. सुरत-अहमदनगर-सोलापूर असा हा महामार्ग असणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्रात सुरु असलेल्या अनेक प्रोजक्टबद्दल माहिती दिली.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे वेगाने व्हावीत, यासाठी भूसंपादन व इतर परवाने देण्याची कार्यवाही अधिक वेगाने व्हावीत. तसेच वन विभागाच्या परवान्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा. राज्यात केंद्र शासनाच्या वार्षिक आराखड्यानुसार 2 हजार 727 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आणखी 5 हजार 801 कोटी रुपयांची कामे राज्यात होणार आहेत. राज्यात बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील अडचणी दूर करावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सध्या 523 प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरू आहेत. यापैकी 194 प्रोजेक्ट पूर्ण झालेत. तर 305 प्रोजेक्टचं काम सुरू आहे. महाराष्ट्राकरीता 5 हजार कोटी मंजूर करण्यात आलेत. 2600 कोटी मंत्रालयाने मंजूर केले आहेत, अशी माहिती गडकरींनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button