breaking-newsक्रिडा

हैदराबादवरील विजयावर बंगळुरूचे भवितव्य अवलंबून

बंगळुरू – अनपेक्षित पराभवांच्या मालिकेपाठोपाठ सलग दोन विजयांमुळे प्ले-ऑफ फेरीची अत्यंत अंधुकशी संधी बाकी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आज रंगणाऱ्या “मस्ट विन’ सामन्यात गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाचे कडवे आव्हान आहे.
उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिल्यापासून आघाडी राखलेल्या हैदराबाद संघाने 12पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर पहिल्या 10पैकी 7 सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांवर विजय मिळविताना प्ले-ऑफ फेरीतील प्रवेशासाठी आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तरीही हैदराबादवर आज विजय मिळविल्यासच त्यांना संधी आहे. आजच्या सामन्यातील पराभव बंगळुरूचे आव्हान संपुष्टात आणू शकेल. बंगळुरू संघ सध्या 5 सामने जिंकून शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असून तळाचे स्थान टाळण्यासाठी त्यांची दिल्लीशी झुंज सुरू आहे.

प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळविण्यासाठी बंगळुरूला केवळ हैदराबादवरील विजय पुरेसा नाही. तर त्यांचे भवितव्य अन्य सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून आहे. त्यातच बंगळुरूची फलंदाजी केवळ विराट कोहली आणि ऍब डीव्हिलिअर्स यांच्यावर अवलंबून आहे. विराट कोहलीने 12 सामन्यांतून 514 धावा करून अव्वल कामगिरी बजावली आहे. तर डीव्हिलिअर्सने 10 सामन्यांतून 358 धावा केल्या आहेत. बंगळुरूकडून गोलंदाजीचा भार उमेश यादवने एकट्याने सांभाळला आहे. उमेशने आतापर्यंत 17 बळी घेतले आहेत.

हैदराबादकडून सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी फलंदाजीची जबाबदारी सांभाळली आहे. शिखर धवनने 369 धावा केल्या असून विल्यमसनने 544 धावा फटकावल्या आहेत. याशिवाय युसूफ पठाण (186), मनीष पांडे (189) आणि शकिब अल हसन (166) यांनीही फलंदाजीत उपयुक्‍त कामगिरी बजावली आहे. न्यूझीलंड आणि हैदराबादचे नेतृत्व करताना एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून विल्यमसनने लौकिक मिळविला असून प्ले-ऑफ फेरीत जाताना हैदराबादचे अग्रस्थान कायम राखण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करेल.

अर्थातच स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमण असा लौकिक मिळवून देणारे भुवनेश्‍वर कुमार (8 बळी), सिद्धार्थ कौल (13 बळी) व संदीप शर्मा (8 बळी) यांच्यासह लेगस्पिनर रशीद खान (13 बळी) व शकिब अल हसन (12 बळी) हे गोलंदाजच हैदराबादचे खरे बलस्थान आहेत. या सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर उद्या बंगळुरूवर मात करण्याचा विश्‍वास हैदराबादचा कर्णधार विल्यमसनने व्यक्‍त केला आहे. बंगळुरूसाठी मात्र ही प्रतिष्ठेचीच लढत आहे.

प्रतिस्पर्धी संघ- 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्‍युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्‍विन्टन डीकॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्‍विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.

सनरायजर्स हैदराबाद– केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, वृद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बेसिल थंपी, टी. नटराजन, सचिन बेबी, विपुल शर्मा, मेहंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button