breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

‘हे’ मसल्याचे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास करतात मदत

सध्या संपूर्ण जग हे कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या संकटाला तोंड देत आहे. हा संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस आणखी पसरत चालला आहे. जगासोबतच भारतही कोरोनाच्या विळख्यात आहे. सध्या भारतात कोरोनाचे 110  रुग्ण आहेत आणि हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा काळात स्वत:चा या कोरोना विषाणूपासून बचाव करणे हा एकमात्र पर्याय आहे. त्यासाठी स्वच्छता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे काही उत्तम पर्याय हे आपल्या रोजच्या वापरातील आहे. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारे सहा मसल्याचे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करु शकतात. पाहुयात ते कोणते पदार्थ आहेत ते…

हळद : हळदीत अण्टीइन्फ्लेमेटरी आणि अॅण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात.

 दालचीनी : दालचीनीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीफंगल आणि अॅण्टीबॅक्टेरिअल गुण असतात, हे कुठल्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

 ओवा : पाण्यात एक चमचा ओवा उकळवून पिल्याने आजाराचा संसर्ग आणि ताप यापासून बचाव होऊ शकतो.

काळी मिरी : काळी मिरीमध्ये अॅण्टीबॅक्टेरिअल, अॅण्टीऑक्सिडंट्स आणि अॅण्टीइन्फ्लेमेटरी गुण असतात. जो वाईट बॅक्टेरियापासून तुम्हाला दूर ठेवतो.

लवंग : लवंगमध्ये असणारे विटॅमिन्स – सी रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत बनवतं.

 हिंग : हिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीइन्फ्लेमेटरी, अॅण्टीबायोटिक आणि अॅण्टीवायरल गुण असतात.

 हे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत बनवतातं

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button