breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

हिंदू महासभेनं ‘कोरोना व्हायरस’ रोखण्यासाठी सूचवलं धक्कादायक औषध

मुंबई | महाईन्यूज

हिंदू महासभेनं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी रामबान औषधी उपाय सांगितला आहे. “गोमूत्राचं प्राशन करून ओम नम शिवाय असा जप करत शेणाचं सेवन करा, म्हणजे कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही, असा दावा हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी केला आहे.

‘कोरोना व्हायरस’मुळे व्हायरसमुळे जगभरात आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत २५९ नागरिक मरण पावले आहेत. तर ११ हजार लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही या आजारावर चिंता व्यक्त केली आहे. भारतातही या विषाणुचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. भारतासह अनेक देशांनी चीनमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना हलवण्याचे काम हाती घेतले आहेत. अशात हिंदू महासभेनं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी भलताच औषधी उपाय सूचविला आहे.

हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज म्हणतात, “गोमूत्र प्राशन केल्यानं आणि गाईचं शेण सेवन केल्यानं कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबू शकतो. कोणत्याही व्यक्तीनं ओम नमः शिवाय म्हणत गाईचे शेण शरीरावर लावल्यास तो आजारापासून वाचू शकतो. कोरोना व्हायरसचा नाश करण्यासाठी लवकरच यज्ञ करणार आहे,” असंही स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले. स्वामी चक्रपाणी महाराज यांनी सूचवलेल्या उपायावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button