breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

हा ही बलात्कारा एव्हढाच मोठा गुन्हा आहे : हेमांगी कवी

मुंबई| सध्या हाथरस बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली आहे. देशभर ह्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटतायत. राजकीय पक्षांवर, पोलिसांवर, मंत्र्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यातच हाथरस घटनेतील पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना झाले होते. त्यावेळी गर्दीतील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

नेहमीच सामाजिक प्रश्नांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होणारी अभिनेत्री हेमांगी कवीने हाच फोटो पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. ‘नुसतं सोशल मीडियावर येऊन बोलू नका मॅडम. बाहेर पडा म्हणणाऱ्यांनो, चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा. आहे का सुरक्षित? कसे वाटतायत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे. मूळ समस्या कुठेय कळतंय का?’, असा रोखठोक सवाल हेमांगीने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button