breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हाॅकर्स झोनसाठी खासदार, आमदारांनी एकत्रित यावे – फेरीवाला महासंघाची भूमिका

पिंपरी –  पिंपरी चिंचवडमधील अतिक्रमणांवरून शहरातील फेरीवाले धास्तावले आहेत.  त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईसाठी आरोप, प्रत्यारोप करणाऱ्या खासदार, आमदारांनी हॉकर्स झोनसाठी एकत्र यावे, अशी मागणी फेरीवाला महासंघाकडून करण्यात आली आहे.

अतिक्रमणे व हातगाडी, टपरीधारकांमुळे शहरातील वाहतूक कोंडी यावरून खासदार श्रीरंगअप्पा बारणे, व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यात आरोप,प्रत्यारोप सुरु आहे. त्यात रस्त्यावर उपजीविका करणारा हातगाडी, टपरीधारक भरडला जाणार आहे. त्यामुळे या गरीब, व गरजू लोकांसाठी बारणे, जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शहरातील लोकप्रतिनिधींनी फेरीवाल्यांचे भले करण्यासाठी एकत्र येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावून कष्टकरी वर्गाला कायस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन फेरीवाल्यांचे नेते व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

तसेच ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फेरीवाला कायदा व धोरण स्वीकारले आहे. मात्र, त्याचा अंमल  करण्याबाबत पालिका प्रशासन चालढकल करीत आहे. त्यांचे निष्क्रिय अधिकारी आणि बेजबाबदार सत्ताधारी यामुळे आधी राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आता भाजपाच्याही सत्ताकाळात हॉकर्स झोनचा प्रश्न लटकलेला आहे. अच्छे दिनचे ते स्वप्नच आता वाटू लागले आहे. राजकीय पक्ष हे कामगार कष्टकरी, फेरीवाला, यांचा केवळ निवडणुकीपुरता विचार करीत आहेत. त्यांनी निवडणुक जाहीरनाम्यात सुनियोजित भाजी मंडई, हॉकर्स झोनच्या वल्गना केल्या. आधी राष्ट्रवादीने अमलबजावणी केली नाही. आता भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी ती केल्यास नक्की सबका साथ सबका विकास होणार आहे. अन्यथा ती पण केवळ घोषणाच ठरणार आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button