breaking-newsआरोग्य

हळदयुक्त दूधाचे हे फायदे…

दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळदी ही अँटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. हिवाळ्यात हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे अनेक फायदे होतात…पाहुयात काय फायदे आहेत आणि ते कसं बनवलं जातं ते…

१. जखम : जर तुम्हाला एखाद्या कारणामुळे जखम झाली तर त्याठिकाणी हळद हे अँटीबॅक्टेरिअल म्हणून काम करतं. हळद बॅकटेरिया मारण्यासाठी मदत करतं

२. शारिरीक दुखणं : शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने फायदा होतो.

३. सुंदर त्वचा : दूध प्यायल्याने त्वचेत एक चमक निर्माण होते. दुधासोबत हळदी सेवन केल्याने त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. खाज, इंफेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते.

४. सर्दी : सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.

५. मजबूत हाडे : दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.

६. झोप न येणे : झोप न येणे ही अनेकांची समस्या असते. पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.

७. पचन : हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.

८. श्वास घेण्यास त्रास : श्वास घेण्याबाबात ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होती. फेफडा, कफ यावर तत्काळ आराम पडतो.

९. वजन कमी करणे : हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

१०. ब्लड शुगर : आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.

हळदीचे दूध कसे बऩवावे…

दोन कप दूध घेऊऩ ते चांगल उखळायचं..दूध उखळत असतानाच त्यात एक चमचा हळद घालून चांगलं मिस्क करायचं…त्यानंतर त्यात चिमूटभर काळीमिरी घालून पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचं…त्यानंतर दूध थोडं कोमट झालं की त्यात गुळ,साखर किंवा मद घालायच..त्यात तुम्ही जायफळही खिसून घालू शकता…तसेच स्वादासाठी एक-दोन विलायचीही टाकू शकता.काजू – बदामही घालून तुम्ही या दूधाची चव आणखी वाढवू शकता..तर असं हे हळदीयुक्त दूध तुम्ही कधीही पिऊ शकता…आणि आपल्या सर्व आजारांना बाय बाय म्हणू शकता…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button