breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडच्या विकासाला अडसर; ‘झारी’तील शुक्राचार्य कोण?

नागरिकांनो, आयुक्त श्रावण हर्डिकर यांना जाब विचारा

माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचे आवाहन

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मधील नगरसेविका तथा माजी स्थायी सभापती ममता गायकवाड यांच्या कार्यकाळात मंजूर केलेले विविध मुख्य रस्ते अडविण्यात आले आहेत. यामुळे वाकड परिसरात विकास कामांचा खोळंबा झाला असून वाहतुकी कोंडीचा प्रश्न निर्माण होवून पादचारी नागरिकांची गैरसोय होवू लागली आहे. अनेक मुख्य रस्त्यांची कामे अडवल्याने नागरिकांनो, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांना फोन करुन जाब विचारा, असे आवाहन माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी केले आहे.

वाकड, पिंपळे निलख प्रभाग क्रमांक 26 परिसरात विविध सिमेंटचे रस्ते मंजूर केले आहेत. यामध्ये पिंक सिटी रोड, वाकड चाैक, कल्पतरु सोसायटी समोरील रोड, पालाश सोसायटी, मॅक्सिमा सोसायटी समोरील विहीर, वेदांता सोसायटी या भागातील रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी विकास कामात अडथळा आणून रस्त्याचा ताबा देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, वाकड परिसरातील मुख्य रस्ते कोणी अडविले? रस्त्यांची कामे अडविल्याने खोळंबा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनो, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या मोबाईल क्रमांक 7887880999 संपर्क साधून जाब विचारा, या आशयाचे फलक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच रस्त्याच्या ठिकाणी फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे.

वाकड परिसरातील विकास कामात वारंवार काही लोकप्रतिनिधी जाणिवपुर्वक अडथळा निर्माण करीत आहेत. सिमेंटच्या रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. परंतू, स्थानिकांनी जमिनीचा ताबा न दिल्याने ही कामे खोळंबली आहेत. सर्वसामान्य लोकांचा विचार करुन रस्त्यांची कामे अडवू नयेत. जागेच्या भूसंपादनाचा मोबदला महापालिका प्रशासनाकडून घेवूनही रस्त्याचा ताबा दिला जात नाही. रस्त्यांच्या कामाचे श्रेय आम्हाला मिळतेय म्हणून विकास कामे अडवून लोकांना वेठीस धरले आहे. – विनायक गायकवाड – माजी नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button