breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी सभापती निवडीसाठी भाजपकडून नगरसेवकांना ‘व्हीप’ जारी

  • सभापती पदासाठी उद्या होणार फैसला
  • भाजपमध्ये संतापाची लाट कायम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपतर्फे विलास मडिगेरी यांनी अर्ज भरला. तर, भाजपचेच नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे यांनी देखील पक्षाच्या विरोधात जाऊन अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांचाही अर्ज दाखल झाला. त्यातच उद्या होणा-या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने व्हीप जारी केला आहे. त्यामुळे सभापती पदावर मडिगेरी यांची निवड होणार की शिंदे यांची हे उद्या दुपारी कळणार आहे.

स्थायीच्या सभापती ममता गायकवाड यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. भाजपकडून शितल शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल होणार अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना उमेदवारी दिली. मडिगेरी यांचा अर्ज दाखल होताच शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी, शिवसेनेचा पाठिंबा घेत स्वतःचा अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपचे आता दोन उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे यांचा अर्ज भरण्यात आला आहे.

भाजपचे निष्ठावान नगरसेवक शितल शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर पक्षाच्या वरीष्ठ स्तरावरून दबाव आणला जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधून जो प्रकार झाला तो नजरचुकीने झाला असेल, असे सांगत मडिगेरी यांच्या नावाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे पुन्हा स्थायीच्या सभापती पदासाठी मडिगेरी यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. तर, काहीजण शितल शिंदे यांच्याच नावावर अद्याप ठाम आहेत. याचा फैसला उद्या दुपारी बारा वाजता महापालिकेत होणार आहे. तथापि, उद्याच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पक्षातील नगरसेवकांना बायहॅन्ड व्हीप जारी केला आहे. त्यामुळे भाजपच्या सदस्यांना पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाच्या सदस्याला मतदान करण्यास निर्बंध बसले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button