breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सोलापूरात आंबेडकरांच्या प्रचारासाठी ओवेसी मैदानात

सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांची १० एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पार्क स्टेडियम येथे संध्याकाळी सभा होणार आहे. यावेळी ओवेसी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेसाठी सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण माने, अण्णाराव पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थितीत राहणार आहेत. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार तयारी केली आहे. ओवेसींच्या सभांना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतो. परंतु त्यापेक्षाही जास्त प्रभाव त्यांचे धाकटे बंधू आमदार अकबरोद्दीन ओवेसींच्या सभांचा पडतो. अकबरोद्दीन यांच्या सभांची मागणी झाली होती. मात्र अद्यापही त्याबाबत निश्चितता नाही.

सोलापूर मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या संघात असल्यामुळे त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु आहे.यासाठी ओवेसींच्या सभेचा कितपत फायदा होतो यावर आंबेडकरांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेष म्हणजे मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या बाजूने जाणार की वंचित आघाडीच्या बाजूने जाणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र वंचित आघाडी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे.

ओवेसींच्या सभांचा कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही परंतु वंचितांची मते आपल्याच पारड्यात पडणार याची आंबेडकरांना खात्री आहे. यामुळे आंबेडकरांचा विश्वास दुनावल्यामुळे खरच मुस्लिमांची मते कुणाला मिळणार याचीही जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button