breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न- संजय राऊत

लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक जणं पुढे येत होती. केंद्र सरकारने मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची सोय केली. याचसोबत राज्य सरकारही या कामगारांसाठी विशेष बस गाड्या चालवत होतं. मुंबईत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या कामगारांना घरी पाठवण्याची जबाबदारी उचलली. गेल्या काही दिवसांत सोनूने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून या कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवलं. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली. सोशल मीडियावर सोनूच्या कामगिरीचं कौतुकही होत गेलं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘सामना’मधील लेखातून सोनूच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? ”कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल”, असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. अशी टीका राऊत यांनी केली आहे.

सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावर उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता ? त्याचा खुलासा लवकरच होईल, असं म्हणत राऊत यांनी सोनू सूदच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button