breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण

मुंबई । प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त “सेवा सप्ताहाचे ” आयोजन आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आठवडाभर चालणाऱ्या या “सेवा सप्ताहात” समाजोपयोगी विविध उपक्रम केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आज नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्रांमध्ये आज आमदार कोळंबकर यांच्या हस्ते, आमदार प्रसाद लाड ह्यांच्या आयोजनाने  “वृक्षारोपण” करण्यात आले.

तसेच कोरोना चा वाढत्या पार्श्वभूमीवर हे रोखण्यासाठी सुंदर नगर को. ऑप. हौ. सोसायटी, ईमारत क्र.१/२ च्या साईबाबा मंदिरा जवळ सेनापती बापट मार्ग, दादर (प) हिथे डॉक्टर आपल्या दारी हे उपक्रम विनामूल्य राबविण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर विभाग तसेच (बी जे एस) ग्रुप यांच्या विद्यमाने विभागातील नागरिकांसाठी पावसाळी आजार (ताप, खोकला, अंगदुखी, थंडी, वाहती सर्दी) या लक्षणांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी व ओषधाचे वितरण करण्यात आले.

यावेळी जितेंद्र कांबळे, राजेश शिरवाडकर (जिल्हाध्यक्ष)  विजय डगरे (अध्यक्ष वडाळा विधासभा), अक्षता तेंडुलकर (अध्यक्षा माहिम विधानसभा) मनोज शहा ( वॉड अध्यक्ष १९२ )  प्रतिक्षा सावे ( महिला वॉड अध्यक्षा १९२), अशोक शर्मा ( जिल्हा  उपाध्यक्ष ), जयंत नाट्टे ( जिल्हा उपाध्यक्ष ), एकनाथ संगम, विवेक भाटकर ( जिला सचिव ), संतोष सुकडे( वॉड महामंत्री), जितू गुप्ता, राजन डेरवणकर, प्रमोद सावंत, बाळा हारेर, मनीष तोडणकर, सूर्यकांत गर्द, सूर्यकांत मुळीक, संदीप तिवरेकर, संतोष शिंदे, अमोल मोहिते, दिपक ढवण, आदर्श दुबे, संतोष खेडेकर, राजेश जाधव रिषीकेश शिखरे,प्रितम शिरसाळे, योगेश आहिरे, संतोष बंगेरा, अजय चव्हाण आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button