breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेना खासदार म्हणाला, मतदान घड्याळाला, शिवसैनिकाने थेट कॉलर पकडली !

उस्मानाबाद – उस्मानाबादमध्ये ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि शिवसैनिक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. खासदार रवींद्र गायकवाड यांना एका शिवसैनिकांनी मतदान कुणाला करायचे विचारले असता, “घड्याळाला करा”, असं उत्तर गायकवाडांनी दिलं. त्यामुळे संतप्त झालेला शिवसैनिक थेट खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी गायकवाड आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. एका शिवसैनिकाने खासदार रवींद्र गायकवाड यांची कॉलरही पकडली. शिवसैनिक आक्रमक होताच गायकवाड यांनी घटनास्थळावरु पळ काढला. ही घटना उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल मतदान केंद्रावर घडली.

शिवसेनेचे मावळते खासदार रवींद्र गायकवाड गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गायकवाडांचा पत्ता कापण्यात आला. त्यांच्या जागेवर ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. यामुळे गायकवाड पक्षावर नाराज आहेत. तिकीट कापल्यामुळे गेले काही दिवस गायकवाड राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांच्या भेटी घेत असल्याचेही समोर आले. यामुळे स्थानिक शिवसैनिक गायकवाडांवर नाराज आहेत.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याने खासदार रवींद्र गायकवाड चर्चेत आले होते. यानंतर एअर इंडियाने त्यांना काळ्या यादीतही टाकलं होतं. शिवाय संसदेतही हा मुद्दा गाजला होता. पण मतदारसंघात ते नेहमीच नॉट रिचेबल असतात, असा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला होता. यामुळे ‘मातोश्री’वरुन गायकवाडांची तिकीट कापण्यात आल्याचे म्हटलं जात होते.

उस्मानाबादमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे रिंगणात आहेत, तर भाजप-शिवसेना युतीकडून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर मैदानात उतरलेत. ओमराजे निंबाळकर हे दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button