महाराष्ट्र

चार शिका-यांनी केला घोरपडीवर सामुहिक बलात्कार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथील घटना

कोल्हापूर l प्रतिनिधी

कोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चार शिका-यांनी एका घोरपडीवर बलात्कार केला. याबाबत कोल्हापूर वन विभागाच्या अधिका-यांनी चौघांना ताब्यात घेतले. मात्र वन विभागाच्या अधिका-यांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. ताब्यात घेतलेल्या शिका-यांवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची याबाबत अधिकारी चर्चा करत होते.

संदीप तुकाराम, मंगेश पवार, जनार्दन कामटेकर, अक्षय सुनील अशी ताब्यात घेतलेल्या शिका-यांची नावे आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील चांदोली वनपरिक्षेत्राच्या गोठणे नियतक्षेत्रात हे शिकारी शिकार करण्यासाठी गेले होते. शिका-यांकडे अवैध हत्यारे देखील होती. जंगलात काहीजण शिकारीसाठी गेल्याची माहिती मिळतच वन विभागाच्या अधिका-यांनी सीसीटीव्हीच्या आधारे शिका-यांचा शोध घेतला.

वन विभागाने चौघांना ताब्यात घेतले. त्याचे मोबाईल फोन तपासण्यात आले. त्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ताब्यात घेतलेल्या शिका-यांनी सामुहिकपणे एका घोरपडीवर बलात्कार केल्याचे रेकोर्डिंग शिका-यांच्या फोन मध्ये मिळाले.

आरोपी शिकारी कोकणातून कोल्हापूरच्या चांदोली गावात शिकारीसाठी आले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र या शिका-यांवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची, हा मोठा पेच वन विभागाच्या अधिका-यांपुढे निर्माण झाला. त्यानंतर चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता चौघांना न्यायालयाने वन कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button