breaking-newsमनोरंजन

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे पुन्हा दिसणार एकत्र

एके काळाचे छोट्या पडद्यावरील सुपरहिट कपल सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याआधी ही जोडी ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये पती-पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेतील सुशांत आणि अंकिताच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनीही चांगलीच पसंती दिली होती. यानंतर ही जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र आली होती. मात्र काही काळाने हे नाते संपुष्टात आले.

परंतु प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही जोडी एकत्र येणार आहे. छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका प्रेक्षकांच्या मागणीवर पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा झी टीव्हीने केली आहे. यासंदर्भातील माहिती झी टीव्हीने सोशल मीडियाद्वारे दिली. झी टीव्हीने पोस्ट केली की, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तो क्षण आला आहे. शुक्रवारी झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता संध्याकाळी ४ वाजता तर जोधा-अकबर मालिका ५ वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचे आत्तापर्यंत ‘काय पो छे’ आणि ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हे चित्रपट आले असून ‘केदारनाथ’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button