breaking-newsमनोरंजन

सुशांत सिंह राजपूतच्या ‘सोनचिडीया’चा दमदार ट्रेलर रिलीज

सुशांत सिंह राजपूतच्या आगामी ‘सोनचिडीया’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसह आशुतोष राणा, मनोज बाजपेयी, भूमी पेडणेकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. २ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये अनेक शानदार डायलॉग आहेत.

ट्रेलरची सुरुवात आणीबाणीच्या घोषणेने होते. चंबल परिसराला पोलिसांनी घेरले असून डाकू लखना (सुशांत सिंह राजपूत) पोलिसांपासून वाचवण्याविषयी भाष्य करताना दिसत आहे. या डाकूंच्या गटाचा मुख्य मनोज बाजपेयी आहेत.

सोनचिडीया चित्रपटाला अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शित केले आहे तर निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. ८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button