breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये: शरद पवार

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकार्याप्रमाणे याची परिणती होणार नाही, अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे.

आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल मुंबई पोलिसांना दिलेले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिलेला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल” असा विश्वास शरद पवार यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलेला आहे.

“मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिनिती होणार नाही.” अशी आशाही पवारांनी व्यक्त केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button