breaking-newsराष्ट्रिय

सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करणार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल केली होती. हेच प्रकरण मुंबईत हस्तांतरित व्हावे, अशी मागणी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर आज निर्णय देताना सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी मंगळवारी याप्रकरणी न्यायमूर्ती हृषिकेश राय यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली होती. यावेळी बिहार सरकारचे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारचे वकील ए. एम. सिंघवी, रियाचे वकील श्याम दिवाण आणि सुशांत सिंहच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर रिया आणि इतर काही जणांवर भारतीय दंड संविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान रियाने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत बिहार पोलिसांनी दाखल केलेली ही एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. या प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालय नेमका कोणता निर्णय देणार याकडे कलाविश्वासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button