breaking-newsमहाराष्ट्र

सिंधुदुर्गातील खड्डय़ांकडे बांधकाममंत्र्यांचे दुर्लक्ष

मुंबई– गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या मार्गाची पाहणी करण्यासाठी बांधकाम मंत्री येणार होते. परंतु त्यांनी खारेपाटण ते कणकवली या दरम्यान रात्रीच्या वेळी रस्त्याची पाहणी केली.त्यामुळे अनेकांची निराशा झाली कणकवली ते झाराप या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अपघात देखील होतात परंतु या रस्त्याची पाहणी त्यांनी केली नसल्याने  नाराजी आहे .

बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील शुक्रवारी सायंकाळी खारेपाटण ते झाराप या महामार्गाची पाहणी करणार होते परंतु ते या मार्गावर रात्री उशिराने दाखल झाल्याने त्यांची ही सफर वाहनातुन घडली तसेच त्यांनी रात्री ओरोस येथे मुक्काम करून सकाळी कोल्हापूर गाठल्याने कणकवली ते झाराप या महामार्गाची पाहणी त्यांनी करण्याचे टाळले .

झाराप ते खारेपाटण या महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य आहे तसेच दर्शक फलक नसल्यामुळे वाहतुकीचा आणि वाहन  वाहनचालकांचा खेळखंडोबा होतो. याशिवाय अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहेत.

त्यामुळे बांधकाम मंत्र्यांचा महामार्ग पाहणीचा दौरयामुळे प्रवासी व वाहन चालक यांना दिलासा मिळाला होता .परंतु कणकवली ते झारापपर्यंत त्यांनी रस्त्याची पाहणी केली नसल्यामुळे मात्र नाराजी निर्माण झाली. कणकवली ते झाराप या महामार्गावर प्रचंड खड्डे व अपघात घडतात तसेच प्रचंड खड्डे असल्यामुळे अपघात घडतात परंतु रात्रीच्या वेळी बांधकाम मंत्री आल्याने त्यांच्या निदर्शनास खड्ड्यांचे रस्ते दिसले नाहीत असे सांगण्यात आले

गौरी गणपतीच्या पाश्र्वभूमीवर बांधकाम मंत्र्यांचा हा दौरा होता परंतु बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाला मंत्र्यांनी पाठिंबा दिला असे प्रवाशांतून बोलले जात आहे. कणकवलीपर्यंत शुक्रवारी रात्रो बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील आले त्यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व मान्यवर उपस्थित होते.

या महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे आदेश बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले तसेच गणेशचतुर्थीच्या  पाश्र्वभूमीवर महामार्गावरील गावांची नावांचे फलक  तातडीने लावावेत असे अधिकारयांच्या बठकीत सांगितले .तसेच गणपती उत्सवाच्या काळात येणार्या चाकरमान्यांचा व वाहतूक खेळखंडोबा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश बांधकाम अधिकार्यातना त्यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले.

बांधकाममंत्री खारेपाटण ते कणकवली या महामार्गावर रात्रीचे वेळी आले आणि त्यांनी बठक घेऊन निघून गेल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग  जिल्ह्याला त्यांनी सापत्नभाव वागणूक दिली असल्याचे राजकीय वर्तुळात चíचले जात आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेनेचे आंदोलन

पेझारी नागोठणे खड्डेमय रस्त्यासाठी आज शिवसेनेने श्रीगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसनिकांनी पेझारी नागोठणे रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता मधुकर चव्हाण यांनी खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, तालुकाप्रमुख राजा केणी, अलिबाग मुरुड विधानसभा संघटक सतीश  पाटील, माजी तालुकाप्रमुख दीपक रानवडे, अलिबाग संघटक अड. सुशील पाटील, प्रकाश पाटील, रुपेश जामकर आदी पदाधिकारी व शिवसनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते.

पेझारी नागोठणे या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. नागोठणे पेझारी या २५ किमी रस्त्यासाठी ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरू होताच रस्त्याची अवस्था खड्डेमय झाली असून कोटी रुपये खड्यात गेले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी वारंवार तक्रार केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता.

राजा केणी यांनी २२ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागला १० दिवसात खड्डे न भरल्यास ३० ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने १० दिवसात खड्डे न भरल्याने राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगाव येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. शिवसनिकांनी रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सार्वजनिक बांधकामचे उप कार्यकारी अभियंता मधुकर चव्हाण व पोयनाड सपोनि जी. एल. शेवाळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चव्हाण यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलिसांनीही आंदोलन असल्याने परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवसेनेच्या रास्ता रोको आंदोलनानंतर खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button