TOP Newsताज्या घडामोडीपुणे

सावधान..पासपोर्ट अपॉइंटमेंट घेताना तुमची होवू शकते फसवणूक!

पुणे |महाईन्यूज|

परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट वेबसाइटसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या काही वेबसाइट सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पासपोर्टसाठी ऑनलाइन अपॉइंटमेट घेताना ती खरी सरकारी वेबसाइट आहे का, याची खात्री करा, असे आ‌वाहन पुणे पासपोर्ट विभागाने केले आहे. या वेबसाइटवरून नागरिकांच्या माहितीचा गैरवापर आणि पैशांची फसवणूक होते आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये पासपोर्टचा अर्ज भरताना अपेक्षित रकमेपेक्षा जास्त रक्कम स्वीकारून फसवणूक झाल्याच्या तक्रारी देशभरातील विविध भागांतून मंत्रालयाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. ऑनलाइन गैरव्यवहार करणाऱ्यांनी पासपोर्टचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मूळ वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या वेबसाइट तयार केल्या आहेत.

अर्जदारांकडील माहिती जमा करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. यापैकी काही बनावट वेबसाइट डोमेनमध्ये वेगवेगळ्या पासपोर्ट साइट तयार करण्यात आल्या आहेत. लोकांकडून मिळणाऱ्या माहितीचा गैरवापर आणि पैशांचीही फसवणूक होते आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून केंद्र सरकारच्या www.passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अथवा ‘एमपासपोर्ट सेवा’ या मोबाइल अॅप्लिकेशनवर पासपोर्टचा अर्ज भरावा, असे आवाहन प्रसिद्धपत्रकात करण्यात आले आहे.

या आहेत बनावट साइट

www.indiapassport.org, www.onlinepassportindia.com, www.passportindiaportal.in, www.passport-seva.in, www.applypassport.org ही आहे सरकारी वेबसाइट www.passportindia.gov.in

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button