TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावधान! गुगल पे वापरतायं

जर तुम्ही गुगल पेचा वापर करत असाल तर सावधान. कारण गुगल पे अॅपच्या कस्टमर केअरमधून बोलतोय असं सांगून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या खात्यातून दोन लाख 62 हजार रुपये लंपास केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोन नंबरची तपासणी केली असता तो गुगल पे कस्टमर केअरचा असल्याचं दाखवत आहे.

किनवट तालुक्यातील गोकुंदा भागात राहणारे आणि सरकारी नोकरदार असलेले भिमराव ज्ञानेश्वर मेहेत्रे यांच्या बँक खात्यात पाच लाख रुपये होते. त्यामधील एक लाख रुपये मेहेत्रे यांनी नातेवाईकाच्या खात्यात पाठवले. त्यानंतर खातं तपासलं असता त्यात चार लाख रुपये शिल्लक होते. परंतु नातेवाईकाला पाठवलेले एक लाख रुपये त्यांना मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी गुगल पेच्या कस्टमर केअरवर कॉल केला. परंतु तो नंबर लागला नाही. काही वेळाने त्यांना 8101295500 या क्रमांकावरुन फोन आला. कस्टमर केअरमधून बोलतोय असे भासवून त्याने भिमराव मेहेत्रे यांच्याकडून युजरनेम, पासवर्ड मिळवले आणि त्यांच्या खात्यातून 2 लाख 62 हजार 744 रुपये काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर भिमराव मेहत्रे यांनी किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि भारतीय तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button