breaking-newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

सावकारकीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  खाजगी सावकारकी करणाऱ्या दाम्पत्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.२३) सकाळी सातच्या सुमारास मोशी, शिवाजीवाडी राधाकृष्णनगर येथील घरात घडली.

पवण जीवन केंद्रे (वय २२, रा. राधाकृष्णनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल जीवन किसनराव केंद्रे (वय ४२, रा. बोरगाव बुद्रुक, हुर्सुल, जळकोट, जि.लातूर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मांडूबाबा पालवे आणि गायाबाई पालवे (रा. इंद्रायणीनगर, आळंदी) या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रे कुटूंबाने काही आर्थीक अडचणींमुळे आरोपी मांडूबाब पालवे आणि त्यांची पत्नी गायाबाई पालवे यांच्या कडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. मात्र ती रक्कम परत करण्यास घरातील काही अडचणींमुळे उशीर होत होता. यामुळे आरोपी पालवे यांनी वारंवार केंद्रे कुटूंबाकडे व्याज आणि मुद्दल पैशांसाठी तगादा लावला होता. तसेच ते वारंवार घरी येऊन आणि फोनव्दारे त्यांना धमकवत होते. काही दिवसांनी आरोपींनी पवण केंद्रे याचा भाऊ तिरुपती याची दुचाकी वडून नेली. यामुळे पवण ही दुचाकी मागण्यासाठी आरोपी पालवे यांच्या घरी गेला. मात्र आरोपींनी ती दुचाकी परत केली नाही. यामुळे निराश झालेल्या पवण याने रविवारी सकाळी सातच्या सुमारास मोशीतील त्याच्या राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.  याप्रकरणी मांडूबाब पालवे आणि गायाबाई पालवे या दाम्पत्याविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button