breaking-newsमहाराष्ट्र

सायकलने प्रवास करणारे ‘ओदिशाचे मोदी’ केंद्रीय मंत्रिपदी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांच्या मंत्रीमंडळाने गुरुवारी (30 मे) मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य समारंभात 57 खासदारांना मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात एक नाव अधिकच चर्चिले गेले. ते आहे ओदिशातील खासदार प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi) यांचे.

प्रताप चंद्र सारंगी आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. सारंगी एका झोपडीत राहतात आणि सायकलवरुन प्रवास करतात. लोकसभेच्या निवडणूक प्रचारात सारंगी यांचे विरोधी उमेदवार कार आणि इतर मोठ्या वाहनांच्या आधारे प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी सायकलवरुन प्रचार केला. पुढे अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी एक रिक्षा भाड्याने घेतली. एवढ्या क्षुल्लक संसाधनांचा उपयोग करुनही त्यांनी करोडपती उमेदवारांना पराभूत केले.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी बालासोर लोकसभा मतदारसंघातून बीजू जनता दलाच्या रविंद्र कुमार जेना यांचा 12 हजार 956 मतांनी पराभव केला. जेना यांची संपत्ती 72 कोटींची आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे ओदिशा प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक यांचा मुलगा निरंजनज्योती पटनाईकही निवडणूक मैदानात होते. त्यांची एकूण संपत्ती 104 कोटी एवढी होती. दुसरीकडे सारंगी यांची जंगम मालमत्ता 1.5 लाखांची तर स्थावर संपत्ती 15 लाख रुपयांची आहे. त्यांच्या उत्पन्नाचे साधन पेंशन आणि शेती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button