breaking-newsराष्ट्रिय

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

नवी दिल्ली : बँक ऑफ इंडियाने अनेक पदांसाठी भरती सुरु केली आहे. ऑफिशयल नोटिफिकेशननुसार, 1 ऑगस्टपासून रिक्त जागांसाठी, भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक उमेदवार 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. या सर्व व्हॅकेन्सी स्पोर्ट्स कोटाअंतर्गत काढण्यात आल्या आहेत.

ऑफिसर पदासाठी 14 रिक्त जागा आहेत. त्यासाठी महिन्याचं वेतन 23700 ते 42020 असू शकतं. तर क्लर्क पदासाठीही 14 व्हॅकेन्सी आहेत. क्लर्क पदासाठी 11765 ते 31540 रुपयांपर्यंत मासिक वेतन असू शकतं.

योग्यता –

ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही स्ट्रीममधील डिग्री असणं आवश्यक आहे. त्याशिवाय A, B आणि C कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्स इव्हेंट/ चॅम्पियनशिप असणंही गरजेचं आहे.

क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10वी पास सर्टिफिकेट आणि D कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्स इव्हेंट/ चॅम्पियनशिप असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

या रिक्त जागांसाठी 18 ते 25 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. वयाची गणना 1 जुलै 2020च्या आधारे केली जाणार आहे.

बँक ऑफ इंडियाच्या रिक्त पदांसाठी SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये ऍप्लिकेशन फी भरावी लागेल. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये फी असेल. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरुन पेमेंट करता येऊ शकतं.

या भरतीसाठी योग्य, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/ वर 16 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारिख 16 ऑगस्ट 2020 निश्चित करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button