breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक कार्यात खरा रियल हिरो दडलेला असतो – मकरंद अनासपुरे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – समाजात अनेक व्यक्ती आपापल्या परीने काम करत असतात. त्यांच्या कार्यात खरा रियल हिरो दडलेला असतो. या रियल हिरोला समाजापुढे आणण्याचे काम मगर सोशल फाऊंडेशन करत आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेते व नाम फाऊंडेशनचे सदस्य मकरंद अनासपुरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. 
चिंचवड येथील कामगार कल्याण मैदान येथे रविवारी (दि. 18 नोव्हेंबर) झालेल्या अण्णासाहेब मगर सोशल-स्पोर्ट्स फाउंडेशन पुरस्कार वितरण सोहळयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जीवनगौरव पुरस्कार लालासाहेब शिंदे यांना प्रदान करण्यात आला. तर, महापालिकेतील विधी समितीच्या सभापती माधुरी कुलकर्णी, संजय वाबळे यांना कार्यक्षम नगरसेवक, तर कैलास कुटे यांना पिंपरी-चिंचवड युवा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मधुकर बाबर,  हास्य सम्राट दिपक देशपांडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुलाब बिरदवडे आदी उपस्थित होते. 
 
अनासपुरे म्हणाले की, खडकवासला धरणांतला गाळ काढण्याचे अतुल्य कार्य नाम फाऊंडेशन व ग्रीन थिंम्ब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 21 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. सर्वांनी यानिमित्ताने भरभरुन मदत करावी. सोशल मिडिया हा इतका गतिमान झाला आहे की, याचा उपयोग सकारात्मकतेने करायला हवा. समाजात अनेक व्यक्ती आपापल्या परीने काम करत असतात. त्यातच खरा रियल हिरो दडलेला असतो, आणि या रियल हिरोला समाजापुढे आणण्याचे काम मगर सोशल फाऊंडेशन करत आहे.  वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी जर एक झाड लावले. तर, ते झाड 10 वर्षे टिकू शकते. पाश्चात्यांच्या रितीरिवाजांमुळे नातेसंबंध संपुष्टात येत असून आपली संस्कृती टिकविणे युवकांच्या हाती आहे.
 
पिंपरी चिंचवड भूषण इंद्रभान सिंग,  बांधकाम भूषण अशोक माने, सुरेश माटे, सुरेंद्र अग्रवाल, समाजभूषण पोपटराव पिंगळे, हेड एच आर फोर्स मोटर्स लि. रामचंद्र होनप, शैक्षणिक भूषण एस डी भालेकर, सहकार भूषण मनीषा कुदळे, युवा भूषण हर्षवर्धन भोईर, उत्कृष्ट वैद्यकीय डॉक्टर संदीप भोसले, युवा उद्योजक निलेश आहेर, उत्कृष्ठ जनरल मॅनेजर आनंद पाटील, महिला भूषण कुंदा भिसे आदींना गौरविण्यात आले. तसेच सहकार भूषण अंकुश प-हाड, उत्कृष्ठ दैनिक महाराष्ट्र टाइम्स, उत्कृष्ठ संस्कृती इव्हेंट मॅनेजमेन्ट संस्कृती इव्हेंट, पत्रकार अतुल क्षीरसागर, आशा साळवी, उत्कृष्ठ फॅमिली श्री व सौ भातखंडे, उत्कृष्ठ दिग्दर्शक रमेश चौधरी, उत्कृष्ठ व्यवस्थापक गोपाळ साकला, सामाजिक कार्यकर्ता कृष्णराव अहिरराव, सक्षम अधिकारी सुरेश पवार, उत्कृष्ठ वर्तमानपत्र एजंट शंकर नामदे, वैद्यकीय धार्मिक भूषण डॉ. खासनीस, सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय खांबे, प्रदीप दर्शले, सुखदेव खेडकर, पंडित खुरंगळे, गणेश फंड, अशोक वाळुंज, मुकेश चौधरी, उत्कृष्ठ दैनिक विक्रेता राजाराम भुजबळ, उत्कृष्ठ मुकादम प्रकाश गायकवाड यांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button