breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सातारा : नवलेवाडीतील प्रकार : कुठलेही बटन दाबले तरी मत कमळाला !

ऑनलाइन टीम / सातारा : 

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, साताऱयात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील नवलेवाडीमध्ये मतदान केंद्रावर घडाळय़ासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

साताऱयातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान सुरू झाल्यावर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळय़ासमोरील बटन दाबले. मात्र व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत जात होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या तिथल्या निवडणूक अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

निवडणूक अधिकाऱयांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घडाळय़ाला मतदान केले तरी ते कमळाला जात असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं. मात्र, गंभीर घटनेबाबत आता पुढे निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही केली जाणार याबाबतच तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button