breaking-newsपिंपरी / चिंचवड

डॉ. नीलम गो-हे आणि बाबा कांबळे यांना संविधानरत्न पुरस्कार प्रदान

पुणे, पिंपरी / महाईन्यूज

भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीच्या वतीने भारताच्या 71 व्या संविधान दिनानिमित्त देण्यात येणारा संविधानरत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम         गो-हे आणि गोरगरिब कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांना पुणे येथे कार्यक्रमात सन्मानपूर्वक देण्यात आला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स हॉलमध्य हा सोहळा पार पडला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आणि बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. गौतम बेंगाळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, अॅड. प्रमोद आडकर, नरसेविका लता राजगुरू, अमोल देवळेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर सोनवणे, नगरसेवक अविनाश बागवे, भाई विवेक चव्हाण, राहुल डंबाळे, संदीप बर्वे, फिरोज मुल्ला आदी उपस्थित  होते.

श्रीपाल सबनीस म्हणाले, तळागाळातील शेवटच्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानाने मूलभूत हक्क मिळवून दिले आहेत. काही फुटीरतावादी व्यक्तींकडून संविधानातील मूल्यांचा -हास होत असून अशा कार्यक्रमा मुळे संवैधानिक हक्क अधिकारांची नागरिकांमध्ये जनजागृती होईल. सविधानरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नीलम गोरे आणि बाबा कांबळे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

निलम गोरे म्हणाल्या, महाविकास आघाडीमुळे प्रबोधनाच्या परंपरांना बळ मिळाले असून सध्याच्या स्थितीत काही आव्हाने व काही शक्तीस्थाने संविधानाची मूल्ये, तत्व विचार व कृती समोर दिसतात. जातीच्या चौकटीबाहेरच्या विवाहांना विरोध, ऑनर किलिंगच्या घटना, महिलांची फसवणूक, ही आव्हाने आहेत. आपली न्यायसंस्था पोलीस, शिक्षक, वैद्यकीय सेवा, उद्योग क्षेत्र ही सामाजिक शक्ती स्थाने आहेत. या सर्वांचा विचार करूनच महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा राजकीय निर्णय झाला.

बाबा कांबळे म्हणाले, गोरगरीब कष्टकरी जनतेची चळवळ सुरू ठेवत असताना संविधानातील सर्वसामान्य जनतेला हक्क अधिकार मिळाल्यामुळे त्यांच्या जगण्याला बळ मिळत आहे. देशांतील चाळीस कोटी असंघटीत कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा  देणारा कायदा झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

विठ्ठल गायकवाड यांनी संविधानरत्न पुरस्कार देण्यामागील भूमिका याबाबत माहिती सांगितली. नीलम गोरे आणि बाबा कांबळे यांना पुरस्कार का देत आहोत. याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या संयोजनसाठी, प्रतीक गायकवाड, अजय लोंढे, रमेश सगट, राहुल चांदेकर, सागर अल्हाट आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button