breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
साई जन्मभूमीच्या वादाला मुख्यमंत्री जबाबदार राम शिंदेंचा आरोप
मुंबई | महाईन्यूज
साई जन्मस्थळाच्या मुद्द्याची दाहकता वाढत असून शिर्डीत पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये पंचक्रोशीतील अनेक गावे सहभागी झाल्याचे रविवारी पाहायला मिळाले होते. दरम्यान साई जन्मभूमीच्या मुद्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुद्धा सुरु झालेले आहेत. भाजपा नेते व माजी आमदार राम शिंदे यांनी याच मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे.
साई जन्मभूमीचा वाद हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेचं निर्माण झाला असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. तर कुठलाही शहानिशा न करता, कोणत्याही इतिहासाचे पुरावे नसताना सुद्धा राज्याच्या प्रमुखाने एखाद्या ठिकाणचा जन्मस्थळ म्हणून उल्लेख करणे हे चुकीचे असल्याचे सुद्धा राम शिंदे म्हणाले आहेत.