breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सहाव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. अक्षय सारस्वत असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश गाजियाबादचा रहिवासी आहे.

तीन दिवसापासून अक्षय सारस्वत हा मुंबईत आला होता. त्याच्या घरचे त्याचा शोध घेत होते. उच्चशिक्षित असलेला अक्षयने शनिवारी त्याच्या नातेवाईकांना विमानतळावर फोन करून बोलावले आणि त्यांच्या समोर इमारतींवरून उडी घेऊन आत्महत्या केली. आपल्या मृत्यूला कोणासही कारणीभूत ठरवू नये अशी त्याने चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. आत्महत्येची घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button