breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

घटस्फोटासाठी एचआयव्हीचे विषाणू सलाईनमधून विवाहितेच्या शरीरात सोडले

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. घटस्फोट मिळवण्यासाठी विवाहितेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आले. असा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महिलेचा पती, सासरा आणि सासू या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह मे २०१५ मध्ये झाला. तेव्हापासून आरोपींनी आपसात संगनमत करून महिलेकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. आरोपींनी वारंवार पैशाची मागणी करून महिलेस मारहाण देखील केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करण्यात आली. दरम्यान, महिला आजारी असताना आरोपींनी सलाईनमधून तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले. त्यामुळे महिला एचआयव्ही बाधीत झाली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संगीता गोडे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button