breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सराईत सोनसाळखी चोरांस रंगेहात अटक

  • गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांची कारवाई

पुणे – खडकी परिसरात पायी जात असलेल्या महिलेल्या गळयातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या तपासात नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

परेश किशोर धावरी (वय 28) आणि आकाश राजेश कंडारे (वय 22, दोघेही रा. शंकराराव चौक, गुजराती शाळा, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी मंगळसूत्र चोरीचे 9 गुन्हे केल्याचे कबूल केले असून, त्यांच्याकडून 193 ग्रॅम वजनाचे 5 लाख 95 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 7 जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास खडकीतील शेवाळे हॉस्पिटल जवळून जात असलेल्या लता सुब्रमण्यम यांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांना चोरल्याची माहिती खडकी पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि गुन्हा घटलेल्या परिसरात पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आयप्पा मंदिराजवळ सापळा लावला. मात्र, आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून आरोपींची दुचाकी पकडली आणि त्यांना अटक केली. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे लता सुब्रमण्यम यांनी दिलेल्या फिर्यादीतील सोन्याचे मंगळसूत्र मिळाले.

तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक, पोलीस कर्मचारी हेमंत माने, तुषार शिंदे, किरण घुटे, अण्णा ठोकळ, रणधीर माने, सुरेश गेंगजे, लक्ष्मण बांगर, बाबा शिर्के यांनी ही कामगिरी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button