breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

समृद्धी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला १३ वर्षांनंतर अटक

नागपूर – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील बहुचर्चित १५० कोटी रुपयांच्या समृद्धी महाघोटाळ्यात गेल्या १३ वर्षांपासून पसार असलेल्या तत्कालीन अध्यक्षाला सीआयडीने काल गुरुवारी बेड्या ठोकल्या. किशोर ठाकरे (५८) रा. प्रिन्स अपार्टमेंट, छत्रपती चौक, असे या अटक केलेल्या अध्यक्षाचे नाव आहे.

२००७ मध्ये समृद्धी सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीत दीडशे कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्षासह ५६ जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालांतराने या महाघोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. त्यावेळी सीआयडीने ५२ जणांना अटक केली. किशोर ठाकरे व अन्य तिघे मात्र या प्रकरणात फरार होते.

अखेर १३ वर्षानंतर किशोर ठाकरे हा छत्रपती चौकात असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. त्यानंतर सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुळकर्णी, उप महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून ठाकरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button