breaking-newsराष्ट्रिय

संपादकांच्या हत्येनंतरही रायझींग काश्‍मीर प्रकाशित

श्रीनगर – रायझींग काश्‍मीर या इंग्रजी दैनिकाचे मुख्य संपादक सुजात बुखारी यांची त्यांच्या दोन अंगरक्षकांसह काल हत्या करण्यात आली. या भीषण हल्ल्यानंतरहीं तेथील कर्मचाऱ्यांनी या दैनिकाचा आजचा अंक नेहमी प्रमाणे प्रकाशित केला आहे.

पहिल्या पानावर संपादकांचा कृष्णधवल पार्श्‍वभूमीवरील फोटो प्रकाशित करून या अंकात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. बुखारी यांच्या मागे त्यांच्या पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या हत्येच्या घटनेचे पत्रकारिता क्षेत्रात मोठीच खळबळ माजली असून त्यांच्या मागे साऱ्या पत्रकारांनी एकजूट दाखवली आहे. त्यांच्यावर आज अत्यंसंस्कार करण्यात आले त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक पत्रकारही उपस्थित होते. अशा भ्याड हत्येने आम्ही दबून जाणार नाही असा संदेशही आज प्रकाशित करण्यात आलेल्या रायझींग काश्‍मीर मध्ये देण्यात आला आहे.

संपादकांची हत्या होऊनही या दैनिकाचे आज झालेले प्रकाशन हे संपादकांना वाहण्यात आलेली अत्यंत योग्य श्रद्धांजली आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या कृतीचे स्वागत केले आहे. दरम्यान त्यांच्या हत्येबद्दल राज्यपाल एन. एन. व्होरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री मेहबुबा यांनी त्यांचे अत्यंदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. काश्‍मीरात गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या गनिमी कारवायांमध्ये हत्या करण्यात आलेले बुखारी हे चौथे पत्रकार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button