breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

संतापजनक! लॉकडाउनचा फायदा घेत ५३ वर्षीय अंध महिलेवर घरात घुसून अज्ञाताकडून बलात्कार

करोनामुळे सध्या देशभरात लॉकडाउन असल्याने लोक आपापल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत. याचाच फायदा घेत एका ५३ वर्षीय अंध महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला बँकेत मॅनेजर पदावर काम करते. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे घरांमध्ये एकट्या अडकलेल्या असहाय्य महिला, लोकांच्या सुरक्षेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

पीडित महिला गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात एकटीच राहत होती. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने महिलेचा पती राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील त्याच्या घरीच अडकलेला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आपण झोपेत असताना एक अज्ञात व्यक्ती घरात घुसली आणि आपल्यावर बलात्कार केला.

सध्या या प्रकरणी पोलिसांच्या हाती कोणताही धागादोरा लागलेला नाही. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने दुसऱ्या माळ्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला असावा आणि यानंतर बाल्कनीतून घरात प्रवेश केला असण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस अधिकारी संजय साहू यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे पोहोचून पाहणी केली. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button